© 2019 by Maha Adventure Council

  • Facebook - Black Circle
  • Twitter - Black Circle
पार्श्वभूमी 

महाराष्ट्राला अतिशय समृद्ध समुद्रकिनाऱ्याबरोबरच सह्याद्री आणि सातपुडा अशा दोन प्रमुख डोंगररांगा लाभल्या आहेत. १९५४ च्या सुमारास महाराष्ट्रात साहसी क्रीडाप्रकारांची सुरुवात ही गिरीभ्रमणाने झाली. आज पश्चिमघाटातील गिरीभ्रमण, गिर्यारोहण, जल साहसी क्रीडा, हवाई साहसी क्रीडा याशिवाय हिमालयातल्या साहसी मोहिमा यांमध्ये लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो संस्था जवळजवळ वर्षभर वेगवेगळ्या वयोगटातल्या हजारो लोकांसाठी साहसी क्रीडाप्रकारांचे आयोजन करत असतात. परंतु, साहसी क्रीडाप्रकारामध्ये मुळातच एक जोखीम, धोका आणि त्यामुळे येणारी अनिश्चितता असते. आणि म्हणूनच अशा साहसी क्रीडाप्रकारांचे आयोजन सुरक्षिततेची पूर्णतः काळजी घेऊन, त्यातला धोका कमी करून आणि त्याच वेळी लोकांना त्यांच्या सहभागाचा पुरेपूर आनंद मिळवून देऊन करणे हे महत्त्वाचे असते. या सुरक्षेअंतर्गत सहभागी माणसे, पर्यावरण आणि साधनसामुग्री यांचा समावेश होतो. 

MAC बद्दल

Maha Adventure Council (MAC) ही ROC च्या विभाग ८ अंतर्गत नोंदणी केलेली संस्था आहे. ही संस्था साहसी क्रीडाप्रकार आणि त्याच्याशी संबंधित इतर क्षेत्रं यामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या  आणि यामध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेल्या अनुभवी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. ह्यामध्ये जमीन-जल-हवाई साहसी क्रीडाप्रकारातील तज्ज्ञ, तसेच या क्षेत्रातील व्यावसायिक व स्वयंसेवी संस्था चालवणारे संस्थाचालक आणि व्यवस्थापन सल्लागार यांचा समावेश आहे. 

MAC चा मुख्य उद्देश हा साहस आणि अन्वेषक भटकंती याला प्रोत्साहन देणं आणि त्यातील सुरक्षितता वाढवण्याचा प्रयत्न करून आनंद वृद्धिंगत करणं हा आहे. सुरक्षेविषयक मार्गदर्शक तत्वं आणि नियम विकसित करणं, आयोजकांना प्रशिक्षण आणि माहिती देणं, त्यांना सुरक्षित आयोजनासाठी सक्षम बनवणं, विविध संस्था आणि सरकारी एजन्सींना सहकार्य करणं आणि सामान्य लोकांची या विषयातली जागरूकता वाढवणं याप्रकारे MAC या विषयात योगदान देणार आहे. महाराष्ट्रातील साहसी समूहाच्या हिताचे रक्षण करण्यासाठीच MAC ची स्थापना करण्यात आली आहे. 

Get Involved with us.